पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्राचाराचा शेवटचा आठवडा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपकडून (BJP) प्रचासासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यासाठी कसब्यात (Pune Kasba Peth Bypoll Election) पक्षाच्या नेत्यांकडून प्रचार यात्रा सुरू आहे. मंगळवारी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) उपस्थित रोड शो (BJP Road show) करण्यात आला. यावेळी स्थानिक नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे जनतेला बदल हवा आहे, कसब्यात परिवर्तन होणार, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते. यावर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, जे नेते आले आणि येत आहेत ते हेमंत रासने यांच्या प्रेमापोटी येत आहेत. शेवटी निवडणूका आल्या की जो तो आपल्या परीने बाजू मांडत असतो. त्यांना बोलायचं आहे ते बोलू द्या. लोक ठरवतील कोणाला कसं निवडून आणायचं. आणि कोणत्याही परिस्थीतीत हेमंत रासने विजयी होणार असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी कसब्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावर विचारले असता उदयनराजे म्हणाले, अहो अजित पवार मोठा माणूस आहे. त्यांना दृष्टांत झाला असेल तर मला माहित नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उदयनराजे भोसले यांनी हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रोड शो करण्यात आला. हा रोड शो मांगीरबाब, म्हसोबा चौक,
बालशिवाजी मंडळ, सेनादत्त पोलीस चौकी, गंजवे चौकं, नवी पेठ, हत्ती गणपती, भावे हायस्कूल, राजाराम मंडळ,
माती गणपती, रमणबाग, शिंदेपार, मोतीबाग, शनिवारवाडा, शिवाजी रोड, तांबट आळी,
माणिक चौक गणेश रोडने लाल महल येथे येऊन याठिकाणी रोड शोचा समारोप झाला.
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | ‘Let those who want to speak, Hemant Rasane will win’! Udayanaraje bhosale on Ajit Pawar’s statement
हे देखील वाचा :
Pune Kasba Peth Bypoll Election | रोड शोनंतर हेमंत रासनेंचा PMPML मधून प्रवास, मतदारांशी साधला संवाद