नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एका केसवर निर्णय देताना कोर्टाने लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (35, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत रवीशने आपल्या अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने केली होती. (Nashik Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रवीश हा विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला. तिच्यासोबत खोटे बोलून लग्न करण्याचे आमिष दाखवून रवीशने दीपालीनगर परिसरात पीडितेवर अत्याचार केला. आरोपीने आपल्याला फसवले असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणुकीची तक्रार दाखल केली. (Nashik Crime News)
यानंतर पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. यु. शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एस. एस. गोरे यांनी युक्तिवाद केला.
यानंतर कोर्टाने साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात
यांनी रवीशला सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कर्मचारी एस. सी. भोये यांच्यासह न्यायालयीन अंमलदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nashik Crime News | Seven years of hard labor for raping by luring marriage; Judgment of Nashik Court
हे देखील वाचा :
Aurangabad News | अतिक्रमण काढण्याचा हलगर्जीपणा भोवला; मनपा अधिकाऱ्यांना कोर्टाने ठोठवाला दंड
Yavatmal Crime News | प्रियकराने धोका दिल्याने प्रेयसीची विष प्राशन करून गर्भातील बाळासह आत्महत्या
MC Stan | रॅपर एमसी स्टॅन बॉलिवूड मध्ये येण्यासाठी सज्ज; साजिद-वाजिदकडून मिळाली ‘ही’ खास ऑफर