पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ८ तरुणांकडून पैसे घेऊन त्यांची ११ लाख ३० हजार घेऊन फसवणूक (Cheating Case) करणार्या बीपीओचालकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
श्रीकांत बालाजी बिरादार (वय ३०, रा. लिलियन अपार्टमेंट, वाकड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरीतील (Pimpri News) एका २८ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार बालेवाडी हायस्ट्रीट येथील फ्रेशहर जॉब हॅटमध्ये मार्च ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत बिरादार याचा फ्रेशहर जॉब हंट हे तरुणांना स्पेसमेंट देणारे कार्यालय आहे. तो बीपीओ कंपन्यांमधील जॉब तरुणांना देत असे. त्याच्याकडे बंगलोर येथील कंपनीचे काम होते. तेथील कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून त्याने ८ जणांकडून ११ लाख ३० हजार रुपये व मुळ कागदपत्रे घेतली होती.
त्यापैकी काही पैसे बंगलोरमधील कंपनीला दिले होते. परंतु, त्यानंतर या कंपनीने काम देणे बंद केले.
त्यामुळे बिरादार या मुलांना काम देऊ शकला नाही.
चतु:श्रृंगी पोलिसांनी बिरादार याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | 11 lakh fraud by 8 people by pretending to be a job; BPO driver arrested
हे देखील वाचा :
Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची आत्महत्या
Pune Crime News | न्यायाधीन वयोवृद्ध बंद्यांना आता स्वखर्चाने जाड अंथरूण आणण्याची अनुमती