उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन – Osmanabad Crime News | उस्मानाबाद शहरातील कुरणेनगर भागात एका शिक्षकाने आपला जिवलग मित्र असणाऱ्या शिक्षकाची आर्थिक देवाण घेवाणीमधून डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही शिक्षकांमध्ये काही आर्थिक कारणांवरुन वाद झाला. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि या मारहाणीत एका शिक्षकाचा मृत्यू झाला. (Osmanabad Crime News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शामराव देशमुख असे मृत शिक्षकाचे नाव आहे तर धीरज हुंबे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. हे दोघे स्मानाबाद शहरातील भोसले हायस्कुल या ठिकाणी कार्यरत होते. आरोपी शिक्षक धीरज हुंबे यांनी शामराव देशमुख यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. आर्थिक देवाण घेवाणीवरुन ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे दोघेही एकाच शाळेत नोकरीस असून दोघेही कुरणेनगर भागात राहायला होते. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच असे कृत्य केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Osmanabad Crime News | osmanabad bhosle high school teacher friend murders another friend due to disagreement over money
हे देखील वाचा :
Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक
Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची आत्महत्या