नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. प्रत्येकजण रंगांचा सण खुप उत्साहात साजरा करत आहे. याचवेळी कलाकार सोफिया हयातचा एक किस्सा खुप वायरल होत आहे. ही घटना ऐकल्यानंतर लोक हैराण होत आहेत. सोफिया हयातने सांगितले की, होळीदरम्यान कशाप्रकारे तिच्याबाबतीत वाईट प्रकार घडला होता. तिने सांगितले की, एका व्यक्तीने तिच्या स्कर्टमध्ये हात टाकला होता.
सोफियासोबत घडली होती अशी घटना
सोफिया हयातने स्पॉटबॉयशी चर्चा करताना म्हटले की, मी होळीच्या पार्टीमध्ये होते. तिथे मोठ्या संख्येने सेलेब्ज होते. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढत होते. मी अशा ठिकाणी थोडी सतर्क असते, जिथे अनेक फॅन्स असतात. यावेळी माझे लक्ष विचलित झाले होते. कारण या पार्टीत मी भांगवाली पाणीपूरी खाल्ली होती. यानंतर मी आनंदाने बेभान झाले होते आणि माझे माझ्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते. यावेळी, मी फोटो काढत होते, त्याचवेळी एका तरूणाने माझ्या स्कर्टमध्ये हात टाकला. अगोदर वाटले की असे कोण कशाला करेल, परंतु पुन्हा तसेच घडले. मग मी त्याच्या छातीवर मारले आणि तो खाली पडला.
View this post on Instagram
मदतीसाठी पुढे आला एक व्यक्ती
सोफिया हयात पुढे म्हणाली, या घटनेनंतर एका मीडियावाल्याने तिला वाचवले आणि तिला गाडीपर्यंत सोडले. यानंतर ती अस्वस्थ होऊन आपल्या घरी गेली. सोफिया म्हणाली, एक मीडियाशी संबंधित व्यक्ती माझ्या जवळ आला, तो माझा मित्र होता. त्याने मला म्हटले की, मी तुला गाडीपर्यंत सोडतो आणि तु आता घरी जा. येथे लोक वेडे होत आहेत. त्याच्या मदतीने मी सेफ्टीसह माझ्या गाडीपर्यंत पोहचली आणि घरी निघाले.
लोकांना हे समजले पाहिजे : सोफिया
सोफिया हयातने या चर्चेच्या दरम्यान म्हटले, मला वाटते की, ही घटना लोकांना समजावी आणि त्यांनी अशा ठिकाणी आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत जावे. सोफिया हयात नेहमी आपल्या सोशल मीडिया पोस्ट आणि छायाचित्रांसाठी चर्चेत असते.