कुलाबा : बहुजननामा ऑनलाइन – आजच्या काळात सोशल मीडिया हा अत्यंत जवळचा मित्र बनला आहे. ज्याद्वारे आपण आपल्या भावनांचे आदण-प्रदान करू शकतो. परंतु त्याच्या गैरवापरही जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. अशीच एक पन्नास महिलांचा सोशल छळ झाल्याची घटना समोर आली आहे. जवळपास पन्नास महिलांना अश्लील फोटो , विडिओ , मॅसेंग करून छळ करणाऱ्या तरुणाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन लोखंडे असे या सुशिक्षित तरुण आरोपीचे नाव असून तो पदवीधर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये एका तरुणीने या संदर्भात तक्रार केली आहे. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून सतत अश्लील मॅसेज , फोटोस येत असल्याने या तरुणीने सांगितले. अनोळखी नंबरवरून ‘हाय’ , चा मॅसेज आल्याने तरुणीने कॉल केल्यास, सचिन नाव सांगून सतत अश्लील मॅसेज, फोटोस येत होते. तरुणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरी , सतत तो प्रकार सुरु असल्याने तरुणीने त्याच्या नंबर ब्लॉक केला.
पोलिसांनी तो नंबर ट्रॅक करण्यास सुरुवात केली. तो नंबर साकीनाका येथील एका कंपनीत काम करणाऱ्या सचिन लोखंडे चा असल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. आरोपीला कस्टडीत घेताच त्याने सगळे आरोप मान्य केले. तसेच चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून त्याने एक – दोन नव्हे तर जवळपास पन्नास महिलांचा असाच छळ केल्याचे निदर्शनास आले. सचिन नंबर लगेच डिलीट करत असल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा मोबाइलला जप्त करून फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवला आहे. इतर चाल झालेल्या महिलांचे नंबर मिळताच त्यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सचिन याने फ्रेंड मेकर नावाचे टूल आपल्या मोबाईल मध्ये घेतले होते. या ऍपद्वारे तो महिलांचे नंबर शोधून त्यांना अश्लील मॅसेज पाठवत असे. तर काही वेळा प्रोफाइल फोटो नसल्याने त्याने तरुणांना देखील अश्लील मॅसेंग पाठविल्याचे समोर आले आहे.