नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘डायल -११२’ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर दिल्ली पोलिस आता अजून एक महत्वाची कामगिरी पार पडणार आहे. नुकतीच दिल्ली पोलिसांच्या ‘डॉग-स्क्वाड’ पथकात भरती झालेल्या पाच कुत्र्यांच्या मदतीने ते आता शत्रूंना तुरूंगात टाकणार आहेत. ही मूक जनावरं दिसायला अत्यंत साधारण आहेत, परंतु त्याच्या ‘शिकार’ च्या चपळ शैलीबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटेल. दिल्ली पोलिस सेवेत दाखल झालेल्या या गोल्डन रिट्रीव्हरची संख्या पाच आहे. या क्षणी या पाचही जणांचे अंदाजे वय १२ ते १५ महिन्यांच्या दरम्यान आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जन्मजात ‘शिकारी’ आहेत. तसेच त्यांना पाण्यात पोहण्याची देणगीदेखील जन्मतःच मिळाली आहे.
आजच्या धावपळीच्या आयष्यात कोणाकडेही अंधव्यक्तीना मदत करण्यास वेळ नसतो. परंतु ह्या ‘गोल्डन रिट्रीव्हर’ कडे अंध व्यक्तीबरोबर रस्त्यावर चालण्याची देखील एक उत्तम गुणवत्ता आहे. ते सुरक्षितपणे त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहचविण्यास मदत करते. त्यांच्याकडे अन्वेषण करण्याची आणि गंध ओळखण्याची देखील उत्तम क्षमता आहे, त्यांच्यात जमिनीच्या आत खोलवर वास घेण्याची क्षमता आहे.
एकदा त्यान्ना सुगंध कळाला, तर तो विसरत नाही. हे मानवी जगाच्या हेरांपेक्षा चांगले हेर असल्याचे सिद्ध झाले आहे. कदाचित हेच कारण आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या राहण्यासाठी वातानुकूलित घरांची सुद्धा व्यवस्था केली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (गुन्हे) सतीश गोलचा म्हणाले, ‘आतापर्यंत मला माहिती आहे की, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), विशेष संरक्षण गट (एसपीजी) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) मध्ये गोल्डन-रीट्रिव्हरची भरती असायची, दिल्ली सोडून आणि कोणत्या राज्य पोलिसात त्यांची भरती केली आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे.
Visit : bahujannama.com