बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या मोदी सरकार शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ओला, उबेर प्रमाणे शेतकरी आता CHC Farm Machinery ऍप वरून शेतीसाठी लागणारी सर्व उपकरणे भाड्याने मागवू शकतो. शेतीशी निगडित व्यवसाय करू इच्छिणाऱ्याला आता सरकार ८० %आर्थिक सहायता देणार आहे.
या योजनेचे नाव कस्टम हायरिंग सेंटर आहे. या योजनेला कृषी यंत्र बँक देखील म्हणण्यात येते. याद्वारे शेजारी शेतीसाठी लागणारे अवजारे भाड्याने मिळवू शकतो. पाच ते पन्नास किलोमीटरमध्ये ही सुविधा मिळणार आहे. तसेच यातील यंत्राचा दर हे सरकार ठरवणार नाही. यामध्ये ज्या शेकऱ्याकडे आपले यंत्र पडून आहे तो देखील ते यंत्र भाड्याने देण्यासाठी या ऍपचा वापर करू शकतात.
सरकारी मदत किती आणि कशी भेटणार
जर तुम्ही कस्टम हायरिंग सेंटर बनवणार असाल तर ४० % मदत सरकार करणार आहे. यामध्ये ६० लाखांपर्यंतचे प्रोजेक्ट पास केले जाऊ शकते. आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे मशीन विकत घेतल्यास आपल्याला २४ लाखापर्यंत सरकारी सहायता मिळवता येणार आहे. याव्यतिरिक्त तुम्ही को ऑपरेटिव्ह ग्रुप मिळून मशीन बँक सुद्धा तयार करू शकता. केवळ यामध्ये सहा ते आठ शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी दहा लाखांपर्यंतचा प्रोजेक्ट पास होऊ शकतो. यासाठी आठ लाखापर्यंत सरकारी मदत मिळू शकते. जर शेतकऱ्याला सबसिडीचा फायदा मिळवायचा असेल तर ते आपल्या भागातील कृषी विभागातील इंजिनिअरशी संपर्क करू शकतात.
नवनवीन उपकरणाच्या मदतीने आधुनिक शेती करणे सोपे असते. मात्र प्रत्येक शेतकरी ते खरेदी करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकार याबाबत स्वतः मध्यस्थी म्हणून काम करणार आहे. सरकारने कस्टम हायरिंग सेंटरचा लाभ घेण्यासाठी एका ऍपची निर्मिती केली आहे. हे ऍप १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. ५० हजारांहून अधिक लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. अधिकाऱ्यांना याबाबत खात्री आहे की सरकारी योजनेचा फायदा घेऊन अधिकाधिकजण याचा वापर नक्की करतील.
Visit : bahujannama.com