मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत हजारो रुग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता गायक अर्जित सिंग यांच्या आईचे निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे आज सकाळी 11 वाजता निधन झाले.
अर्जित सिंग यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अभिनेत्री स्वास्तिका हिने सांगितले होते. सोशल मीडियावर तिने याबाबतची पोस्टही केली. स्वास्तिकाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘अर्जित सिंगच्या आईसाठी A रक्तगटाची गरज आहे. त्या अम्री धाकुरिया येथे उपचारासाठी दाखल आहेत. चित्रपट दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांनी लोकांना विनंती केली होती. त्यांनी बंगाली ट्विट करून अर्जित सिंग आईसाठी मदत मागितली होती.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय, अभिनय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील नामावंत व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर आता अर्जित सिंग यांच्या आईचे निधन झाले.
#Copied
গায়ক অরিজিৎ সিংয়ের মা–র জন্য এ নেগেটিভ ডোনার চাই আগামীকাল ঢাকুরিয়া আমরিতে। উৎসাহী রক্তদাতারা যোগাযোগ করুন নিতাশার সঙ্গে 8017197476 নাম্বারে।।— Srijit Mukherji (@srijitspeaketh) May 5, 2021
अर्जित यांची 2005 मध्ये करिअरला सुरुवात
अर्जित सिंग यांनी 2005 मध्ये करिअरची सुरुवात केली. त्यांनी सिंगिंग रिऍलिटी शो ‘फेम गुरुकुल’मध्ये भाग घेतला होता. मात्र, त्यामध्ये त्यांना जास्त प्रसिद्ध मिळाली नाही. मात्र, त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांना खरी ओळख आशिकी-2 मधील तुमही हो या गाण्यातून मिळाली.