नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना भयभीत करून सोडलं असतानाच आता अशा संकटातच काळ्या बुरशीचा (Black Fungus) धोका वाढताना दिसत आहे. तर भारतात अनेक भागात म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) आजार वाढत आहे. यामुळे रुग्णाची संख्या वाढत असताना मृत्यू सुद्धा होत आहे. अनेक राज्यात देखील या आजाराचा संसर्ग वाढला असून महाराष्ट्रात तर काळ्या बुरशीने ९० जणांचा प्राण घेतला आहे. यावरून एम्सकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाने (AIIMS) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असे समजते की, काळ्या बुरशीची (Black Fungus) ओळख पटविणे आणि त्याच्या उपचारासाठी मदत करू शकणार आहे. तर काय आहेत मार्गदर्शक सूचना जाणून घ्या.
‘या’ रुग्णांना अधिक धोका –
> ज्या रुग्णांना मधुमेहाचा आजार आहे. मधुमेह असुनही ते tocilizumab सारख्या स्टेरॉईड औषधाचे सेवन करतात.
> कॅन्सरचे उपचार सुरु असलेले अथवा जुन्या आजाराने त्रस्त.
> tocilizumab आणि स्टेरॉईडचे जास्त सेवन करतात.
> कोरोनाचे गंभीर रुग्ण जे प्राणवायू मास्क अथवा व्हेंटिलेटरवर आहेत.
काळ्या बुरशीचा संसर्ग (Black Fungus) झाल्यास कसे ओळखाल?
> नाकातून रक्त वाहणे, पापड्या जमणे अथवा काळ्या रंगाचे काही बाहेर येणे.
> नाक बंद होणे, डोके अथवा डोळे दुखी, डोळ्यांच्या पापण्यांवर सूज, धुरकट दिसणे, डोळे लाल होणे, कमी दिसणे, डोळे उघडझाप त्रास होणे
> चेहऱा सुन्न होणे अथवा झणझण्या येणे. तोंड उघडल्यावर चावण्यासाठी त्रास होणे.
> दातांचे पडणे, तोंडात अथवा आजुबाजुला सूज.
काळ्या बुरशीची लक्षणे दिसल्यास ‘ही’ घ्या काळजी –
> कोणत्याही कान, नाक, डोळे म्हणजेच ENT डॉक्टरकडे जावे. अथवा अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे जावे.
> उपचार रोज घ्यावेत. जर मधुमेह असेल तर ब्लड शुगर मॉनिटर करत रहा.
> इतर कोणताही आजार असल्यास त्याचे औषध घेत रहा आणि लक्ष ठेवा.
> स्वत:हून कोणत्याही स्टेरॉईड तसेच इतर कोणत्याही औषधाचे सेवन करू नये. तसेच, डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
> MRI आणि CT स्कॅन करावेत. नाक आणि डोळ्याची तपासणी आवश्यक आहे. हेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करणे.