नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच मोबाइल ग्राहकांना नवीन सिम घेण्यासाठी किंवा बदलण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या आउटलेटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. दूरसंचार विभाग घरबसल्या ग्राहकांच्या पडताळणी प्रक्रियेला मंजुरी देऊ शकते. दूरसंचार विभागाने त्याचा मसुदा तयार केला आहे आणि लवकरच अंतिम मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली जाऊ शकते. आता घरबसल्या ग्राहकांची पडताळणी होईल व सिमकार्ड घरी डिलिव्हर केले जाईल. सिमकार्ड ग्राहकांच्या पडताळणीसाठी ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलवर कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्रे मिळताच सिम कार्ड वितरित केले जाईल. व्हेरीफिकेशनसाठी ग्राहकाला नंबर सक्रिय करावा लागेल. आता अॅपमधून फोटोही काढला जाईल व दुसर्या मोबाइल नंबरवर ओटीपीद्वारे पडताळणी केली जाईल.
मागील महिन्यात नव्या नियमाची घोषणा झाली
सिमकार्ड पडताळणीत होणारी फसवणूक टाळण्यासाठी दूरसंचार विभागात बल्क खरेदीदार आणि कंपन्यांसाठी ग्राहक पडताळणीचे नियम कठोर केले आहेत. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम कंपनीला नवीन कनेक्शन देण्यापूर्वी कंपनीची नोंदणी तपासून घ्यावी लागेल आणि दर ६ महिन्यांनी कंपनीची पडताळणी करावी लागेल. कंपन्यांच्या नावे वाढत्या सिमकार्डच्या फसवणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडून कंपनीच्या नोंदणीची तपासणी करावी. यापूर्वी टेलिकॉमने दूरसंचार ग्राहकांना पडताळणीच्या दंडनाच्या नियमात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक छोट्या चुकांसाठी टेलिकॉम कंपन्यांना १ लाख रुपये दंड आकारला जाणार नाही. आतापर्यंत ग्राहक पडताळणीचे नियम न पाळल्याबद्दल सरकारने दूरसंचार कंपन्यांना ३,००० कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे.