Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | गणेशोत्सवाचा 7 वा दिवस असल्याने सकाळपासून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सोमवारचा दिवस असताना देखील भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. सकाळी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्रस्टच्या श्रींची आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी देखील श्रींचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन (Punit Balan) यांनी अजित पवार आणि अमित ठाकरे यांचा सन्मान केला तर मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे (Sanjeev Javale) यांनी पंकजा मुंडे यांना सन्मानित केले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर दीपक मानकर (Deepak Mankar), राष्ट्रवादीचे पुणे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी देखील बाप्पांचे दर्शन घेतले. अजित पवार यांनी आरती आणि दर्शन झाल्यानंतर ऐतिहासिक अशा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन’ची पाहणी केली. अजित पवार हे भवनातील काही गोष्टी मोठया उत्सुकतेने पाहत होते. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारी आणि पुनीतदादा बालन यांनी भवनाबाबत अजित पवार यांना माहिती दिली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), भाजपच्या स्वरदा बापट (Swarda Bapat) यांनी देखील श्रींचे दर्शन घेतले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune)
संध्याकाळी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), आर.एम.डी. फाऊंडशेनच्या (RMD Foundation) उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल (Shobha R Dhariwal), आर.एम.डी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan), अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari), विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalinder Supekar), माजी सनदी अधिकारी निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवर महाआरतीसाठी दाखल झाले.
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सपत्नीक महाआरती केली. इतर मान्यवरांच्या हस्ते देखील महाआरती झाली.
सर्व मान्यवरांचा ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीतदादा बालन आणि जान्हवी धारीवाल बालन यांनी सन्मान केला तर मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी शोभाताई धारीवाल यांना सन्मानित केले. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती. अशा गर्दीत देखील अनेक मान्यवरांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
उद्या म्हणजेच मंगळवारी रात्री 8 वाजता सिने अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) यांच्या हस्ते महाआरती होणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
Comments are closed.