बहुजननामा ऑनलाइन टीम – व्हॉट्सअॅप मागील काही दिवसांपासून एकामागून एक फीचर आणत आहे. त्याच क्रमाने व्हॉट्सअॅप आता अॅपवर शॉपिंग(shopping) बटणदेखील अॅड करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे वैशिष्ट्य व्यवसायांसाठी फायदेशीर असेल आणि ते त्यांची विक्री(shopping) वाढविण्यात सक्षम होतील.
व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरअंतर्गत यूजर्सना बिझनेस व्हॉट्सअॅप अकाउंट्स प्रोफाइलच्या जवळ शाॅपिंगचे बटण दाखवले जाईल. हे बटण स्टोअर चिन्हासारखे दिसेल. हे सामान्य व्हॉट्सअॅप अकाउंट यूजर्स बिझनेस व्हॉट्सअॅप अकाउंट पाहण्यास सक्षम असतील.
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनुसार, दररोज व्हॉट्सअॅप बिझनेस अकाउंटमध्ये 175 मिलियन लोक मेसेज करतात. कंपनीने असेही म्हटले आहे की, दररोज 40 मिलियन यूजर्स व्हॉट्सअॅपवर बिझनेस कॅटलॉग पाहतात.
व्हॉट्सअॅपच्या मते, जगभरातील व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी शॉपिंग बटण प्रसिद्ध केले जात आहे. या बिझनेस अकाउंटमध्ये व्हॉईस कॉल बटण दिले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. व्हॉइस कॉल बटणासाठी, यूजर्स कॉल बटणावर टॅप करून व्हॉइस आणि व्हिडिओ यामध्ये निवड करू शकतात.
व्हॉट्सअॅप शॉपिंग बटण वापरण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही बिझनेस अकाउंटवर जावे लागेल. हे अकाउंट कोणाचेही असू शकते, ज्यातून आपण उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी अलीकडेच मेसेज पाठविला किंवा प्राप्त केला आहे.
आपल्याला येथे बिझनेस अकाउंटमध्ये खरेदीचे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करून आपण त्या बिझनेसद्वारे ऑफर केलेल्या प्राॅडक्टचे कॅटलॉग पाहू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, व्हॉट्सअॅप सुपर अॅप बनण्याच्या मार्गावर आहे आणि व्हॉट्सअॅप पेदेखील भारतात सुरू झाले आहे. यूपीआय आधारित पेमेंट्स व्हॉट्सअॅपवरही करता येते.