मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय संघासाठी खेळने ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यामुळे मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो होतो. गोळी झाडून स्वत:ला संपवून टाकावे, असे विचार मनात आले होते, असा धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याने केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने संघातून वगळल्यामुळे असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीची व्यथा जगासमोर मांडली. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीबी सामन्यांच्या मालिकेत प्रवीण कुमारने लक्षवेधक कामगिरी केली होती. मात्र, संघातून बाहेर करण्यात आल्यानंतर प्रवीणकुमार अतिशय तणावात होता.
प्रवीण कुमारने या वेदनादायी आठवणी मुलाखतीत व्यक्त करताना म्हटले की, मी नवीन तरुण मुलांना स्पॉन्सर करतो, जवळपास 10 मुलींची लग्नं लावून देण्याचे काम मी केले आहे. अनेक क्रिकेटरांना आर्थिक मदतही केली आहे. भारतामध्ये तुमच्याबद्दल एक वातावरण निर्माण केले जाते. तसेच, माझ्याबद्दल चुकीचे वातावरण निर्माण केले आहे. ती वातावरणनिर्मिती झाली की, पुन्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत. याच तणावातून मी स्वत:ला बंदुकीतून गोळी झाडून संपविण्याचा विचार करत होतो.
पण, गाडीत असलेल्या माझ्या मुलांच्या फोटोवर माझी नजर पडली. त्यांच्या चेहर्यावर स्मीतहास्य होते. त्यांचा तो फोटो पाहून मी माझ्या लहान मुलांसाठी तरी हे धाडस करू शकलो नाही. त्यानंतर, तो विचार मी डोक्यातून कायमचा काढून टाकला, असे प्रवीण कुमार म्हणाला.आयुष्यात अनेक धक्के बसले, त्याचदरम्यान मी दारू पीतो असेही कारण मला सांगण्यात आले. पण, कोण पीत नाही ? लोकांनी अशी धारणाच बनवून ठेवली आहे. मग, अनेक चांगली कामे करतो, त्याकडे का पाहात नाहीत ?, असा सवालही प्रवीण कुमारने विचारला.
Visit : bahujannama.com