बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलीस कर्माचार्याने स्वत: गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ( Police commit suicide ) उडाली असून ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सखाराम भोये (वय-42) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळींज पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
आश्चर्य म्हणजे सखाराम भोये यांनी वरिष्ठ पोलीस नरिक्षकांच्या दालनात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हवालदार सखाराम भोये हे मागील चार वर्षापासून पालघर जिल्ह्यातील वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील तुळींज पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. भोई यांच्या आत्महत्येने पोलीस दलात शोकाकूल वातवरण पसरल्याचे पहायला मिळत आहे.
Maharashtra: Head constable of the Vasai-Varar Police Commissionerate in the Palghar district, died by suicide. He shot himself in the Tulinj police station today in the morning. The body has been sent to a hospital for conducting post-mortem procedures.
— ANI (@ANI) December 24, 2020