बहुजननामा ऑनलाईन – एल. टी. मार्ग पोलीस ठाणे परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी शुक्रवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार या मुलीच्या नातेवाईकांनी एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात केली होती. पण शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान या मुलीचा मृतदेह पायधुनी येथील सार्वजनिक स्वच्छता गृहात आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एक अल्पवयीन शुक्रवारपासून आपल्या घरातून बेपत्ता आहे अशी तक्रार या मुलीच्या नातेवाईकांनी एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान पायधुनी येथील सार्वजनिक स्वच्छता गृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान त्या मुलीवर अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचा संशय तिच्या नातेवाईकांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे त्यांनी या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.