बहुजननामा ऑनलाइन टीम – एका अज्ञाताने बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक(Masturbation) प्रकार मुंबईत घडला आहे. आत्मसंरक्षण प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असे एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
अभिनेत्रीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, युकेचा कोड असणाऱ्या त्या क्रमांकावरुन शुक्रवारी दोन वेळा आपल्याला फोन आला असता कट केला होता. तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा आपण चुकून तो स्वीकारला. यावेळी समोरील व्यक्ती हस्तमैथून करत होती. आपल्याला खूप मोठा धक्का बसला, मी त्याचे स्क्रिनशॉट घेतले आहेत.यानंतरही अज्ञात व्यक्ती अभिनेत्रीला सतत मेसेज पाठवत होती. याशिवाय तिला नावाने हाक मारत होती.
संबंधिताकडून माफी
अभिनेत्रीने ट्विटरच्या माध्यमातून आरोपीचे मेसेज आणि व्हिडीओ स्क्रीनशॉट शेअर केले. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलिसांनाही टॅग केलं. दरम्यान अभिनेत्रीचा त्रागा आणि आपण अडचणीत आल्याचं लक्षात येताच अज्ञात व्यक्तीने माफी मागत आपण २० वर्षीय विद्यार्थी असून चूक झाल्याचं म्हटलं. एवढेच नाही तर आरोपीने आपले मेसेज आणि व्हिडीओ कॉल एका मैत्रीणीसाठी होते, तिचा फोन क्रमांकही सारखाच असल्याचा दावा केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.