बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या मृतांच्या आकड्यांमुळे नागरिकांध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून अंबाजोगाईत 8 कोरोना मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वाराती रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 8 रुग्णांचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना एकाच सरणावर ठेउन अखेरचा अग्नी दिला. अंबाजोगाईतील मांडवा रोडवर न.प.च्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बीड जिल्ह्यात मृत्यू दर चिंतेचा विषय ठरत असून गेल्या 8 दिवसांत 38 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 8 सप्टेंबर आठ दिवसांत 38 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 914 आहे. तर आतापर्यंत 4 हजार 110 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मृत्यूनंतरही मृतदेहाचे हाल होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर आंबेजोगाईत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.