चेन्नई : बहुजननामा ऑनलाईन – तमिळ मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्री वीजे चित्राने हॉटेलच्या रुममध्येच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून तमिळ चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या 28 वर्षीय अभिनेत्री चित्राचा सिलींगला लटकलेला मृतदेह आढळून आला. काही दिवसांपूर्वीच उद्योगपती हेमंत यांच्यासोबत तीचा साखरपुडा झाला होता. ईव्हीपी फिल्म सिटीमध्ये शुटींग आटोपून चित्रा मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजता आपल्या हॉटेलमधील रुममध्ये आल्या होता. हॉटेलमध्ये त्या भावी पती हेमंत यांच्यासमवेत राहात होत्या.
हेमंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, चित्रा शुटींगवरुन परतल्यानंतर अंघोळीसाठी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, खूप वेळ उलटून गेल्यानंतरही त्या बाथरुममधून बाहेर येत नसल्याचे लक्षात येताच हेमंत यांनी दरवाजा ठोठावला. तरीही, चित्राकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हेमंत यांनी हॉटेल स्टाफला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, डुप्लीकेट चावीने हॉटेल रुममधील तो दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी, सिलींगला चित्राचा मृतदेह लटकलेला अवस्थेत आढळून आला.