बाराबांकी वृत्तसंस्था – पत्नीला आणायला सासरवाडीला जाणाऱ्या दलित तरुणाला चोर समजून जमावाने मारहाण करत चक्क पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. त्याला आधी झाडाला बांधून मारहाण केली. त्यानंतर त्याला पेटवून दिले. या घटनेनंतर उपचार घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
सुजीत कुमार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुजीत कुमार गुरुवारी रात्री आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीला जात होता. त्यावेळी रघुपुरवा गावात कुत्र्यांचा कळपाने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर तो कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एका घराजवळ लपला. तेव्हा तेथे स्थानिक रहिवासी श्रवण कुमार, उमेश, राम लखन, आणि दोन जणांनी त्याला घराजवळ लपलेले पाहून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुजीतने त्यांना सांगितले की तो आपल्या पत्नीला आणण्यासाठी जात आहे. तरीही लोकांनी त्याचं काहीएक ऐकून न घेता. चोर असल्याचे सांगून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
Barabanki: A man, Sujit Kr,was thrashed&set ablaze by locals in Raghopur village y'day after he was mistaken to be a thief when he hid in a house after being chased by dogs. He's now admitted in hospital.2 people have been arrested Sujit was was on way to his in-laws house.(19.7) pic.twitter.com/eAZT8kpeIv
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 20, 2019
कपडे काढून झाडाला बांधून मारहाण
सुजीतला या लोकांनी पकडून त्याचे कपडे काढले. त्यानंतर त्याला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या गस्ती वाहनाने येऊन त्याची सुटका केली. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा उपचारादरम्यान सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.