बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा आपली फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करते. यासोबतच ती आहाराबाबतही खुप काळजी घेते. तिला माहित आहे की, एक नियमित जीवनशैली आणि डाएटमुळेच सौंदर्य कायम राहाते. जाणून घेवूयात शिल्पाचे फिटनेस सीक्रेट आणि तिचा डाएट प्लॅन…
शिल्पाने दिलेले आरोग्य मंत्रा
1 प्रवासात नेहमी योग्य आहार घेणे शक्य नसते, यासाठी प्रवासाला जाताना नेहमी ड्राय फ्रूट्स, नट्स किंवा घरी बनवलेला ग्रॅनोला सोबत ठेवा, ज्यामुळे आरोग्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच राहणार नाही.
2 शिल्पा शेट्टी टीव्ही पहाताना स्नॅक्स वैगरे खात नाही. तिचे म्हणणे आहे की, अशावेळी जास्त खाल्ले जाते. आपल्या मुलांनाही अशा सवयीपासून दूर ठेवा.
3 शिल्पा म्हणते, जेवण नेहमी छोट्या भांड्यातच वाढा. कारण छोट्या भांड्यात तुम्ही एकाच वेळी जास्त खाऊ शकत नाही. यामुळे तुम्ही जास्त खाणार नाहीत.
4 शिल्पा प्रत्येक सुमोर 28 ते 30 वेळा चावून खाते. असे केल्याने जेवण चांगल्या प्रकारे पचन होते.