बहुजननामा ऑनलाईन
आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधीच चेन्नईचा संघ खूप चर्चेत होता. संघ व्यवस्थापन व खेळाडू यांच्यापैकी 14 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता कोरोनाचा दिल्ली संघात शिरकाव झाला आहे. संघाचे सहाय्यक फिजीओ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक फिजीओथेरपिस्ट यांना केरोनाची लागण झाली आहे. ते सध्या नियमानुसार सक्तीच्या क्वारंटाइन कालावधीत आहेत. दुबईत दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या दोन चाचण्यांमध्ये ते निगेटिव्ह आढळले होते, पण त्यांच्या तिसर्या चाचणीचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आढळला आहे. दरम्यान, दीर्घ काळ प्रतिक्षा केल्यानंतर आयपीएल 2020चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 30 ऑगस्टच्या आसपास वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते. पण अचानक चेन्नईच्या संघातील 13-14 जणांना कोरोनाची लागण झाल्याने वेळापत्रकात फेरबदल करण्यात आले.