बहुजननामा ऑनलाईन – राजस्थानच्या जयपूरमधील द्रव्यवती या नदीत एका युवतीने अचानक उडी मारल्याची घटना समोर आली होती. काही काळापूर्वी ही महिला नदीच्या काठी चालत होती, अचानक मुलीने आपले कपडे काढून नदीत उडी मारली. ही मुलगी पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहू लागली. हे पाहून तेथील काही नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ नदीत उडी मारून त्या महिलेचा जीव वाचवला पण या महिलेने या पोलीस अधिकाऱ्याचा कडकडून चावा घेतला. अहवालानुसार ही महिला परदेशी असल्याचे समजते.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की एका महिलेने नदीत उडी मारली अशी माहिती पोलिसांना कळाली होती. थोड्या वेळाने पोलिस तिथे पोहोचले तेव्हा नदीच्या पाण्यावर या मुलीच्या डोक्याचे केस दिसले. यावेळी प्रसंगावधान दाखवत मानसरोवर पोलिस स्टेशनचे एसएचओ सुरेंद्र यादव यांनी तातडीने नदीत उडी मारली, सोबत कॉन्स्टेबल गणेशनेही पाण्यात उडी घेतली. बरीच मेहनत घेतल्यानंतर मुलीची सुटका करण्यात आली. मात्र या महिलेचा पोलीस अधिकाऱ्याने जीव वाचवला पण तिने या अधिकाऱ्याचा चावा घेतला.
सुरेंद्र यादव जेव्हा महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा ती त्यांना विरोध करत होती. ती बाहेर येण्यास तयार नव्हती. तिने हात पाय मारले. तसंच तिने सुरेंद्र यादव यांना चावल्याचेही समोर आले आहे. तरिही सुरेंद्र यांनी दिला जिद्दीने बाहेर काढले. मात्र बाहेर आल्यानंतरही ती महिला पुन्हा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत होते. दरम्यान, त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. या महिलेचे आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही समोर आले नाही. पोलीसही या प्रकरणाची विचारपुस करत आहेत.