बहुजननामा ऑनलाइन : ड्रायविंग लायसन्स मिळण्यासाठी रोज हजारो लोक अर्ज करतात , RTO ऑफिसच्या पायऱ्या झिजवतात. तरी ड्रायविंग लायसन्स मिळण्यात काहींना अपयश मिळतेच . त्यात आता उच्च न्यायालयाने देशभरात ड्रायविंग लायसन्स संदर्भात नवीन नियम लागू केला आहे. ज्यामुळे काही लोकांनाच हे ड्रायविंग लायसन्स मिळणार आहे. जर तुम्ही ड्रायविंग लायसन्स साठी अर्ज करू पाहता आहेत तर हे नक्की वाचा ..
उच्च न्यायालयाने लागू केलेल्या नियमानुसार अशिक्षित लोकांना ड्रायविंग लायसन्स मिळणार नाही. देशभरात हा नियम लागू करण्यात आला आहे. त्या लोकांना ट्राफिक संदर्भातील नियम समजत नाहीत , तसेच त्यांना सिग्नल देखील कळत नाहीत . ज्यामुळे लोकांच्या जिवाचे देखील नुकसान होते. या मामल्याची दखल घेत, उच्च न्यायालयाने हा नियम लागू केला आहे.