नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. आपल्या अधिवेशनातील पहिल्याच भाषणात धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. या वेळी ते म्हणाले की, काहीही करा पण शरद पवारांचा नाद करु नका, पण केला. अहो, सगळ्या पवारांना कळायंला तुम्हाला १० जन्म घ्यावे लागतील. अगदी कुस्तीच्या आखाड्यात म्हणाले की, पवार पॅटर्न संपला. पण, पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, पवार हे आडनाव जरी असलं तरी तो एक विचार आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
फडणवीस यांनी शरद पवारांबद्दल शिवसेनेचं मत काय होतं, हे सामना या मुखपत्रात छापून आल्याचा संदर्भ देत पेपरची जुनी कात्रण सभागृहात आणली होती. पवारांबद्दल मला नितांत आदर आहे, असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकाच केली. मात्र, धनंजय मुंडेंनी यावरुन फडणवीसांना टार्गेट केलं. शरद पवार हा एक विचार आहे, तो विचार कधीच संपत नसतो, असे मुंडेंनी म्हटले. तसेच, मित्र म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता, कुणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नको, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांनी सभागृहात बोलताना 'सामना'च्या जुन्या बातम्या वाचून दाखवत आमचं नेतृत्व मा. @PawarSpeaks साहेब यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. यावर हरकत घेत हा उल्लेख कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी केली. अध्यक्षांनी मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार. pic.twitter.com/d0BpiLJDSg
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 18, 2019
शिवसेनेला दिलेला शब्द न पाळल्याचे सांगत आम्हाला तुम्ही शब्द पाळायचे शिकवू नका, असे फडणवीस म्हणाले. भाजपाचे 105 आमदार निवडून येऊनही सत्तेत नसल्याची उद्विग्नता फडणवीसांकडे पाहून दिसून येते, असे म्हणत घणाघाती शाब्दिक हल्ला केला. तसेच, मुख्यमंत्रीपदाचा शब्द तुम्ही पाळला नाही, कपट तुम्ही केलं आणि आज हे सरकार कपटाने आलंय, असे तुम्ही म्हणताय. तुम्ही कसही, कुठलही कपट करायचं अन आम्हाला दिलेला शब्द पाळायचा असं तुम्ही सांगतात, असे म्हणत मुंडेंनी फडणवीसांवर टीका केली.
Visit : bahujannama.com