मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – रशियातील Joint Institute for Nuclear Research (JINR) प्रकल्पासाठी भारतातून कौस्तुभ वाडेकर आणि रितेश रेड्डी सरी (Kaustubh Wadekar and Riteish Reddy Sari) या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे दोघेही हैदराबाद येथील इंडियन इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉंलॉजीमधील (Indian Institute of Chemical Technology (IICT) केमिकल इंजिनिअरिंग (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमाचे तिस-या वर्षातील विद्यार्थी आहेत. जगभरातील 12 देशांतून निवड झालेल्या 26 विद्यार्थ्यांमध्ये या दोघांचा समावेश आहे. या निमित्ताने अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड ही अभिमानास्पद गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.
जेआयएनआर संशोधन प्रकल्पासाठी निवड करताना कौस्तुभ आणि रितेशच्या आयसोल (आयएसओएल) मेथडची निवड झाली आहे. ज्यामध्ये आयसोल मेथडचा वापर हेवी बीम रिऍक्शन्सचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. याचा मुख्य उद्देश माशा इन्स्टॉलेशनला अपग्रेड करण्याचा असणार असल्याचे कौस्तुभने स्पष्टीकरण देताना सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे या प्रकल्पाचे सादरीकरण जेआयएनआरने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
आण्विक भौतिकशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संबंधित क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी जेआयएनआर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. येथील प्रायोगिक उत्पादनांचा,संशोधनांचा वापर हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून औद्योगिक, वैद्यकीय,आणि इतर तंत्रिक विकास कामांध्येही केला जात आहे. जगभरातील 23 देशांहून अधिक देशांचे सहकार्य जेआयएनआरला मिळत आहे.