पुणे बहुजननामा ऑनलाईन – सामान्य माणसांमध्येच अंधश्रद्धा असते असं नाही. तर बऱ्याचदा शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात. असं मत अणू शास्त्रज्ञ आणि अणू उर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अंधश्रद्धेची पाळंमुळं समाजात रुतलेले आहेत. विवध सामाजिक स्तरांवर आणि पातळ्यांवर ती वेगवेगळ्या पद्धतीने पसरलेली आहे. गणपती दुध पितो ही अफवा ९०च्या दशकात कशी पसरली आणि त्यानंतर त्याचं काय झालं. ते आपण पाहिलं आहे. तर केवळ सामान्य माणसंच नाही तर शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात. असं स्पष्ट मत काकोडकर यांनी मांडलं.
मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. त्याचा गौरव वाटतो. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.