नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Baspan ka Pyar | बालपणीचे प्रेम तर खुप क्यूट असते. मुलांच्या निष्पापतेशी संबंधीत हे प्रेम एका मुलाने व्यक्त केले, जे आतापर्यंत लाखो लोकांनी ऐकले आहे. सोशल मीडियावर सध्या बसपन का प्यार (Baspan ka Pyar) ट्रेंड करत आहे. या मुलाने शाळेतच आपल्या प्रेमाची आठवण काढत गाणे गायले, जे वायरल झाले आहे. इंस्टाग्राम (Instagram Trending Video) वर तर या गाण्यासोबत आतापर्यंत हजारो रिल्स बनवून अपलोड करण्यात आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचे शर्ट घातलेला मुलगा गाणे गाताना दिसत आहे. अतिशय गंभीर चेहर्यासह मुलगा आपल्या जानेमनला बालपणीचे प्रेम कधी विसरू नको असे सांगताना दिसत आहे. आपल्या प्रेमासारखे प्रेम इतर कुणीही करणार नाही, असेही त्याने म्हटले आहे. पाठीमागे एक टीचर चेयरवर गाणे ऐकून हसताना दिसत आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे हा निष्पाप मुलगा बचपन का प्यार ऐवजी बसपन का प्यार बोलत आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिला गेलाय. इंस्टाग्रामवर या ऑडिओवर अनेक लोकांनी रिल बनवून शेयर केला आहेत. हे गाणे सध्या ट्रेंड करत आहे. मात्र, हा मुलगा कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड करण्यात आला, हे सर्व स्पष्ट झालेले नाही. मात्र, लोक हा व्हिडिओ खुप पसंत करत आहेत.
Web Titel : school kid singing baspan ka pyar love song goes viral on instagram flooded with reels
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update