मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये कोट्यवधी लोकांची खाती आहेत. याचे कारण एसबीआयच्या सेवा कोट्यावधी लोकांना आवडतात. एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट फॅसिलिटी ऑफर करत असतात. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका खास खात्याबद्दल सांगत आहोत, जे पैशाच्या बचतीसह पैसे वाढवण्याचा पर्याय उपलब्ध करते. मल्टी ऑप्शन डिपॉझिट (एमओडी) शी जोडल्या गेलेल्या एसबीआयचे सेव्हिंग प्लस खातेही याच खात्यांपैकी एक आहे. या मध्ये सरप्लस अमाउंट जास्ती झाल्यास ती आपोआप फिक्सडिपॉजिट मध्ये ट्रान्सफर केली जाते.
कोण उघडू शकते अकाउंट
SBI च्या सेविंग प्लस अकाउंट कोणतीही व्यक्ती उघडू शकते. जे बँकेत बचत खाते उघडण्यास योग्य आहे. हे अकाउंट सिंगल किंवा जॉईंट ऑपरेट केले जाऊ शकते.
किती ठेवू शकता मिनिमम बॅलेन्स
या अकाउंटमध्ये मंथली एवरेज बॅलेन्स असणे अनिवार्य आहे. मेट्रोमध्ये ३०००, शहरी भागात ३००० रुपये, अर्ध-शहरी भागात २००० रुपये आणि ग्रामीण भागात एक हजार रुपये. सेविंग प्लस अकाउंटमध्ये एसबीआईच्या बचत बँक खात्यासारखे व्याज मिळते.
किती रक्कम ट्रान्सफर होईल
सेविंग्स प्लस अकाउंट २५,००० रुपये पेक्षा जास्त रक्कम फिक्स्ड डिपॉजिट मध्ये ट्रान्सफर होते. जे किमान १०,००० रुपये आहे आणि ते १००० रुपयांच्या गुणांमध्ये आहे. याचा अर्थ असा होतो की, मल्टी ऑप्शन डिपॉजिट अकाउंटमध्ये ट्रान्सफर साठी किमान थ्रेसहोल्ड लिमिट ३५,००० रुपयांची आहे.
या सुविधा मिळतात
बचत बँक खातेदारांना उपलब्ध असलेल्या एटीएम कार्ड्स, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट सारख्या सुविधा एसबीआयच्या बचत प्लस खात्यातही उपलब्ध आहेत. मल्टी ऑप्शन डिपॉजिट्सवर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.