बहुजननामा ऑनलाईन – हरियाणामधील फरिदाबाद येथील एका माध्यमिक शाळेच्या शिपायाने अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. निवृत्तीच्या दिवशी आपण हेलिकॉप्टरने आपल्या घरी जावं असं त्याच स्वप्न होत. या शिपायाने आपल्या निवृत्तीच्या दिवशी हेलिकॉप्टरने आपल्या घरी जाऊन आपले अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या या शिपायांची सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान सादपूरा गावातील या कुरे राम या शिपायाची अशी इच्छा होती की त्याने त्याच्या निवृतीच्या दिवशी हेलीकॉप्टरने घरी यावे. त्याने हे त्याच्या कुटुबियांना बोलूनही दाखवले होते. यावर त्याचे कुटुंबीय त्याला खूप हसले होते. पण त्याच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरच्यांनीही त्याला साथ दिली आणि त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ही सादपुरा गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या निमका येथील शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टर उडाले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते गावामध्ये सपाट करुन तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या ‘हॅलीपॅड’वर उतरले.
हेलिकॉप्टरमधून घरी येण्याचे कुरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ३ लाख ३० हजार रुपये जमवले आणि हेलिकॉप्टर बुक केले. या हेलिकॉप्टरमधून कुरे यांच्या कुटुंबातील सर्वजण शाळेतून घरी आले. या सर्वांना आणण्यासाठी हेलिकॉप्टरला आठ फेऱ्या माराव्या लागल्या. आमचे कुटुंब श्रीमंत नाही. आमच्याकडे जमीनही नाही. मात्र त्याचा अर्थ आम्ही आमची स्वप्न पूर्ण करु शकत नाही असा होत नाही. माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व कुटुंब एकत्र आल्याचा मला आनंद आहे’ असं मत राम यांचे भाऊ कुमार यांनी या हेलिकॉप्टर प्रवासानंतर बोलताना मांडले.