नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एका आठवड्यातच एफडी नंतर आता आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय आरडी खातेधारकांना आता 0.15 टक्के कमी व्याज मिळेल. बँकेने नवे दर लागू केले आहेत. 1 ते 10 वर्ष कालावधीच्या आरडी खात्यावर व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 6.10 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी 10 जानेवारीला एसबीआयने 1 वर्षापासून 10 वर्षांपर्यंत मुदतपूर्ण होणार्या लॉन्ग टर्म डिपॉझिट्सवर एफडीच्या दरात सुद्धा 0.15 ची कपात करण्याची घोषणा केली.
एसबीआय आरडी रिकरिंग डिपॉझिटचे नवे दर
1 वर्ष ते 2 वर्षांसाठी व्याजदर 6.10 टक्के
2-3 वर्षांसाठी व्याजदर 6.10 टक्के
3-5 वर्षांसाठी व्याजदर 6.10 टक्के
5-10 वर्षांसाठी व्याजदर 6.10 टक्के
एसबीआय आरडी खातेधारकांना प्रत्येक महिन्याला किमान 100 रूपये जमा करणे जरूरी असते. परंतु, बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर अधिक व्याज मिळत आहे. सध्या भारतीय स्टेट बँक आरडीवर 6.10 टक्क्याच्या दराने व्याज देत आहे. तर, पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर 7.20 टक्के दराने व्याज मिळत आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा