बहुजननामा ऑनलाईन – प्रत्येक भारतीयाची बँक आणि ‘सर्वसामान्यांची बँक अशी भारदस्त घोषवाक्ये मिरविणारी स्टेट बॅंक भारतातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. या बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी १ तारखेपासून करण्यात येणार असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे.
यामध्ये ग्राहकांच्या ठेवीवरील व्याजदरात ०. ७५ टक्क्यांनी कपात केल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे. या पार्श्वभुमीवर बँकेने कमी मुदतीच्या १७९ दिवस असणाऱ्या मुदत ठेवीवरील व्याजदरात ०. ५ ते ०. ७५ टक्यांनी कपात केली असल्याची माहिती बॅंकेने दिली आहे.
तसेच रिटेल विभागातील दीर्घ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरात ०. २० व बल्क विभागातील व्याजदरात ०. ३५ टक्यांनी कपात केल्याची माहितीही बँकेने दिली. स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे आणि याच बँकेने २ कोटी रुपये आणि त्यावरील ठेवींवरील व्याजदरातही मोठी कपात केली आहे.