बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी वर्षभराच्या आतच कॉंग्रेसचाही ‘हात’ सोडला. फुले आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसचा राजीनामा दिला. सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून जेमतेम वर्ष झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
बहराईच मतदार संघाच्या माजी खासदार सावित्रीबाई यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी भाजपमधून राजीनामा दिला होता. त्यांनी त्याचा कार्यकाळ पूर्ण केला होता. कॉंग्रेसमध्ये आपलं कोणीही ऐकत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन आता आपण स्वतःचा पक्ष काढणार असल्याचे सांगितले.
Former BJP MP Savitri Bai Phule who joined Congress earlier this year, has resigned from the party, says 'my voice is not being heard in Congress,hence I am resigning. I will form my own party' pic.twitter.com/hJYiefyt1H
— ANI (@ANI) December 26, 2019
2012 मध्ये सावित्रीबाई भाजपकडून बहराईचमधून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यातही त्या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Visit : bahujannama.com