बहुजननामा ऑनलाइन टीम : कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्वीट देखील केले आहे. ‘आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा #CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार?’ असा प्रश्न करुन धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे.
आर्थिक डबघाई
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्थादिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
दुसरीकडे, खगोलीय अविष्कार कंकणाकृती सूर्यग्रहण गुरुवारी आहे. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसले. खगोलप्रेमींसह सर्वांनीच हे विलोभनीय दृष्य पाहिले. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींही सूर्यग्रहण पाहिले. मात्र, ढगांमुळे सूर्य दिसला नाही, असे ट्विट मोदींनी केले आहे.
Like many Indians, I was enthusiastic about #solareclipse2019.
Unfortunately, I could not see the Sun due to cloud cover but I did catch glimpses of the eclipse in Kozhikode and other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts. pic.twitter.com/EI1dcIWRIz
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2019
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन म्हटले की, ‘भारतातील अनेक लोकांप्रमाणे मी देखील 2019 मधील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ढगांमुळे सूर्य दिसला नाही. पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली. तज्ज्ञांशी चर्चा करुन याबद्दल माहिती देखील घेतली. ‘ पंतप्रधान मोदींनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी लागणार खास चष्माही घेतला होता. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो ट्विट करत एका युजरने आता मीम व्हायरल होतील, असे म्हटले. त्यावर मोदींनी उत्तर देत म्हटले की, तुमचे स्वागत आहे. एन्जॉय करा.
Visit : bahujannama.com