‘…म्हणून मी भाजपमध्ये आलो’ : भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया !
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. यासाठी ते लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी गेले होते. अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीज महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले.
https://twitter.com/Chh_
भाजपप्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना उदयनराजे म्हणाले, “लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेनं मी हे पाऊल उचललं आहे. मोदी-शहा देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. त्याचबरोबर लोकशाही त्यांनी मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.
यानंतर अमित शहा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपसोबत आहेत. भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. 3 महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये आले आहेत. भाजप पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेत आणखी मोठा विजय होईल. 2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. 2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. उदयनराजेंच्या प्रवेशानं सर्व खुश आहेत.”
https://twitter.com/BJP4India/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. कलम 370 हटवल्यानंतरही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती. उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. राजे असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. त्यांच्या येण्यानं भाजपची ताकद वाढली आहे.”
दरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. ते साताऱ्यात नेतृत्व करत आहेत. ते अनेक पक्षाशी जोडले गेले असले तरी त्यांचे भाजपशी उत्तम संबध आहेत.”
यापूर्वी उदयनराजेंनी 1995 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा फायदा झाला नाही. त्यामुळे भाजपनं त्यांना दूर केलं होतं. आता उदयनराजेंच्या राष्ट्रवादी सोडण्याने पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे.
- काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
- अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा
- ‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या
- कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर
- कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या
- ‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय
- तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या
Comments are closed.