नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याचं मंगळवारी(दि 6 ऑगस्ट रोजी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांचं पार्थिव आज(बुधवार दि 7 ऑगस्ट) भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आलं होतं. यावेळी अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यात अनेक नेते आणि कार्यकर्ते होते. यावेळी एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी हेही यावेळी उपस्थित झाले. त्यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर तेही भावूक झाले होते. सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देताना त्यांनाही अश्रू अनावर झाले.
महाशय धर्मपाल गुलाटी यांना आपण अनेक जाहिरातीत पाहिले आहे. सध्या गुलाटी यांचा हा रडतानाचा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Delhi: Mahashay Dharampal Gulati, the owner of MDH spice company, gets emotional after paying tribute to former External Affairs Minister #SushmaSwaraj. pic.twitter.com/7uqkS3jPxy
— ANI (@ANI) August 7, 2019
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची कारकीर्द पुढच्या पिढीसाठी आणि राजकारणात सध्या सक्रिय असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक असणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत सुषमा स्वराज यांनी देशाच्या हिताचाच विचार केला. कलम 370 रद्द झाल्यानंतरही त्यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला होता. याशिवाय नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले होते. राजनाथ सिंह, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला खांदा दिला.