नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टपाल खात्यात भरती होत आहे. या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांसाठी नोंदणी व फी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार १४ डिसेंबर २०१९ पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा:
नोंदणी आणि फी जमा करण्यासाठी प्रारंभिक तारीखः ५ डिसेंबर २०१९
नोंदणी आणि फी जमा करण्याची अंतिम तारीखः १४ डिसेंबर २०१९
पोस्टचे नावः पदांची संख्याः
ग्रामीण डाक सेवक (GDS) ५,७७८
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा:
उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे पाहिजे.
अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे.
Visit : bahujannama.com