बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – धम्मसेवक संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भारतीय संविधान स्पर्धा परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ स्थानिक म. गांधी भवनात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद होत्या. यावेळी संविधान तज्ञ प्रा. देविदास घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब काटकर, साधनाताई, सागर समदुर यांची प्रमुख उपस्थिती होती. ही परीक्षा मराठी, उर्दु व इंग्लीश या माध्यमातून घेण्यात आली होती.
मराठी माध्यमातून प्रथम सचीन बाबुराव सोसाले (चिखली), शुभांगी मुरलीधर झोरे (दे. राजा), द्वितीय क्रमांक पुजा सुरेश अग्रवाल, (दे. राजा), इंग्रजी माध्यमातून प्रथम प्रतिक्षा लक्ष्मण साळवे (बुलडाणा), द्वितीय पद्मज्योती मिलिंद दाभाडे, तृतीय क्रमांक प्रियंका प्रकाश पैठणे तर उर्दू माध्यमातून प्रथम मोहमद ताहा, द्वितीय मसतुरा शाहीन, तृतीय क्रमांक साअेमा परविन हिने पटकावला. या विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत, स्पर्धा परिक्षेचे पुस्तक, चरित्र ग्रंथ, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या परीक्षेत जिल्ह्यातून २१३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सुत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन वानखडे, अर्चना जाधव, प्रास्ताविक प्रा. गौतम अंभोरे तर आभार प्रदर्शन लक्ष्मण साळवे यांनी केले. या कार्यक्रमासाठी राजेश खंडेराव, जी. पी. अंभोरे, राम हिवाळे, सुनील गवई, अरुण सरकटे, एम. एस. मोरे, एस. एल. डवरे, नितीन जाधव, सुनील सुरडकर, कोळे यांनी परिश्रम घेतले.