जळगाव : समाचार ऑनलाईन – चर्मकार उठाव संघाकडून पिपरखेड येथील जि.प. शाळा व ग्रामपंचायत आणि चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याबरोबर तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी, प्रांत चाळीसगाव यांच्या कार्यालयात जयंती साजरी करता यावी म्हणून संत शिरोमणी रविदास यांचे तैलचित्र भेट देण्यात आले.
यावेळी बोलतांना संत रविदास आणि रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सारखे असून आज दोघा महापुरुषांची जयंती एकत्र असल्याचा हा योगायोग जुळून आला आणि दोघा महापुरुषांची जयंती आपल्याला साजरी करता येणार असल्याची माहिती चर्मकार उठाव संघाचे प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी दिली. यावेळी राज्य संघटक शिवाजीराव गांगुर्डे, सिद्धार्थ मोरे, उदय अहिरे, आंनद गांगुर्डे, सरपंच वंदना पाटील, भाऊसाहेब पाटील, त्र्यंबक मोरे, शालीक अहिरे, गांगुर्डे, व्यापारी आघाडीचे देवेंद्र गांगुर्डे, भैयासाहेब देवरे, गोकुळ वराडे, चित्रकार धर्मराज खैरनार, नगरसेवक अरुण अहिरे, दीपक मोरे, विजय मोरे, संजय वानखेडे, आदी उपस्थित होते.
तालुक्यातील डोण येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने रविदास जयंती साजरी करण्यात आली. सकाळी गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी कीर्तनातून ज्ञानार्जनाचा कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील हिरापूर येथे चर्मकार उठाव संघाच्यावतीने संत रविदास यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आले