चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी आपल्या संसाराचा त्याग करून समस्त समाजाला आपले कुटुंब समजून त्यांना दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. कीर्तनाच्या माध्यमातून जनतेच्या अंतर्बाह्य शुध्दीवर त्यांनी भर दिला. अमर्याद कार्यकक्षेचे ओझे घेत समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. जनतेच्या दु:खमुक्तीसाठी कळवळणारा महामानव म्हणजे संत गाडगेबाबा होते, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
संत गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र डेबूजी फोर्स आणि डेबूजी बहुउद्देशीय समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची १४३ वी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. स्थानिक सोमेश्वर मंदिर सभागृहात आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रथमत: पुलवामा येथे भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळाच्या गजरात शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
भजन मंडळासह सोमेश्वर मंदिरातून शोभायात्रा निघाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष शिंदे होते. याप्रसंगी विद्या देवाळकर, निशा धोंगडे, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे धनंजय तावाडे, भाऊराव तुराणकार, भारती शिंदे, विश्वास गाडीवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण भोस्कर यांनी केले. संचालन पूजा भोस्कर यांनी तर आभार राजेश क्षीरसागर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पन्नालाल चौधरी, विकास भोजेकर, सहदेव राऊत, राजेश क्षीरसागर, अरुण भोसकर, शंकर भोजेकर, नितीन माने, पप्पू काटकर, निकुंज शिंदे, पंकज जोरगेवर, तालिब शेख, जबर शेख, जयश्री राऊत, सविता भोसकर, छाया क्षीरसागर, ललिता भोजेकर, वासुदेव भिलकर, धनु भोजेकर, देवराव कोंडेकर, नारायण चव्हाण, वनिता भिलकर, सतीश भोसकर, स्नेहल भोसकर यांनी सहकार्य केले.