मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Sanjay Raut on Underworld | शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut on Underworld) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले असून त्यांनी मुंबईतील घडामोडी आणि भोंगे, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) यामागे ‘डी’ कंपनी (D Company) आणि अंडरवर्ल्डचा पैसा काम करत असल्याचं म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ईडीने 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणामध्ये यूसुफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याला अटक केलं होतं. जेलमध्ये असताना त्याचा तुरूंगात मृत्यु झाला होता. त्याने कमावलेल्या बेकायदेशीर पद्धतीने कमाईचा काही भाग नवनीत राणा यांच्या खात्यामध्ये असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut on Underworld) यांनी केला आहे.
अंडरवर्ल्ड कनेक्शन :
लकड़ावाला को ED ने ₹200 करोड़ के मनी लांड्रिंग केस में अरेस्ट किया था, लॉकअप में ही उसकी डेथ हो गई। यूसुफ की गैरकानूनी कमाई का हिस्सा अब भी नवनीत राणा के अकाउंट में है।तो ED कब पिलाएगी राणा को चाय?क्यों बचाया जा रहा है इस D-गैंग को? बीजेपी चूप क्यूँ हैं? pic.twitter.com/hJ1itnitlL— Sanjay Raut (@rautsanjay61) April 27, 2022
राणांच्या आर्थिक संबंधाचा एक पुरावा मी समोर आणला असून राणा दाम्पत्य अचानक रामभक्त होतं ते हनुमान भक्त झालं आहे. ते भक्तीमध्ये ते इतके बुडालेत की त्यांनी ‘मातोश्री’ला (Matoshree) आव्हान देत मुंबईत धिंगाणा घातला आहे. आताच्या भोंगे आणि हनुमान चालिसा, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामागे अंडरवर्ल्डचं कनेक्शन आहे. ज्याप्रमाणे 1992 च्या दंगलीमध्ये पाकिस्तान (Pakistan) आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा समावेश होता. त्याप्रमाणे गेल्या 15 दिवसांपासून जे काही घडतंय त्यातून परत एकदा तशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दिसत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, जर राणा दाम्पत्याचं मनी लॉन्ड्रिंगचंच प्रकरण असेल तर नवाब मलिक (Nawab Malik), अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आमच्यासारखे अनेक लोक ‘ईडी’चे (ED) बळी ठरले आहेत तर मग राणा दाम्पत्य यातून कसं काय सुटु शकतं?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
Web Title :- Sanjay Raut On Underworld | shivsena sanjay raut mp navneet rana underworld connection ed yusuf lakdwala bjp
हे देखील वाचा :
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना नवी उपाधी; ‘हिंदू जननायक’ म्हणून औरंबादमध्ये झळकले बॅनर !
Pune Crime | बाल विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर FIR