पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | सहकारनगर परिसरातील दोन दुकानावर सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police) छापा (Raid) घालून बॉश कंपनीचे (Bosch Company) बनावट ऑटो पार्ट (Fake Auto Part) विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी (Pune Police) दुकानदारावर गुन्हा (FIR) दाखल केला असून 82 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. अनुप शिरीष पटनी Anup Shirish Patni (रा. विमल विहार सोसायटी, बिबवेवाडी-Bibwewadi) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे (Pune Crime) नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी रेवणनाथ केकाण Revannath Kekan (वय 40, रा. काळेपडळ, हडपसर-Hadapsar) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवणनाथ केकाण हे प्रोटेक्ट आय पी इंडिया कंपनीत (Protect IP India Company) सिनियर इन्वेस्टिगेट ऑफीसर (Senior Investigating Officer) आहेत. त्यांच्या कंपनीकडे बॉश कंपनीचे कॉपीराइटचे (Copyright) अधिकार आहे.(Pune Crime)
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दुकानात बॉश कंपनीचे बनावट ऑटो पार्ट विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांची भेट घेऊन त्याची माहिती दिली. त्यांनी सहकारनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी पदमावती (Padmavati) येथील नगिना अपार्टमेंटमध्ये असलेल्या श्री ऑटो टेडिंग या दुकानात छापा घातला. तेथे दुकानाची तपासणी केली असता दुकानात बॉश कंपनीचे 46 हजार रुपयांचे ग्लो प्लग चे 46 बनावट नग मिळून आले. तसेच पुष्पा टॉवरमधील दुसरे दुकान महाराष्ट्र ऑटोलाईन येथे छापा घातला असता तेथे 36 हजार रुपयांचे बनावट 36 नग आढळून आले. सहकार नगर पोलिसांनी हा सर्व माल जप्त करुन पटणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime | FIR against shopkeeper selling counterfeit Bosch auto parts; 82 thousand goods seized from 2 shops in Sahakarnagar area
हे देखील वाचा :
Coronavirus In Maharashtra | कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती होणार?