मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut On CM Eknath Shinde | काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला (Balasaheb Thackeray Memorial) भेट दिली. त्यानंतर ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडून स्मृतीस्थळाचे ‘शुद्धीकरण’ केल्याचं समोर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊत म्हणाले, “आज आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनाच प्राधान्य देऊन पुढे जात आहोत. कोणी काहीही म्हणालं, कितीही टीका केली तरी, बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. शिवसेनाप्रमुखांना जाऊन १० वर्षं झाली. त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला. ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे, त्यांचे विचार आमचे असं ते म्हणत आहेत, हे ढोंग आहे.
“बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. ढोंगाला लाथ मारली पाहिजे, असं ते म्हणाले.
दुर्दैवाने आज काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत, असे सांगून जनतेची
दिशाभूल करत आहेत. पण ही जनता पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठावान आहे”, या
शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली. पुढे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantryaveer Savarkar) भारतरत्न देण्याची मागणी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sanjay Raut On CM Eknath Shinde | shivsena sanjay raut slams cm eknath shinde group on balasaheb thackeray
हे देखील वाचा :
Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा
Pune Crime | ‘अप्पर’ची पोर गुन्हेगार नावाने व्हिडिओ व्हायरल करणार्या ‘रॅपसिंगर’वर FIR