सांगली : बहुजननामा ऑनलाईन – विश्रामबाग परिसरातील सत्यसाईनगरमध्ये (SatyaSai Nagar, Vishrambaug, Sangli) एका डॉक्टरने बाह्यरुग्ण विभागात (OPD) मध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Sangli Crime) केल्याचा प्रकार घडला आहे. या डॉक्टरच्या पत्नीनेदेखील दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी (Sangli Crime) एक चिठ्ठी लिहिली आहे (Suicide Note), ती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डॉ. संपत पाटील (Dr. Sampat Patil) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. संपत पाटील यांची घरातच ओपीडी होती. त्यांची कन्या परगावी शिक्षण घेत आहे. पाटील यांनी दवाखान्याच्या मागे असलेल्या एका खोलीत दोरीच्या साह्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी (Sanjay Nagar Police, Sangli) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पंचनामा केला असून, डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. त्यात डॉक्टरांनी ‘माझ्या आत्महत्येला कुणालाही दोषी धरू नये’, असे म्हटले आहे.
Web Title :- Sangli Crime | doctor-sampat patil-committed-suicide-by-hanging-himself-in-Satyasai nagar near vishrambaug area sangli crime news
हे देखील वाचा :
Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक