नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अंतिम टप्पात आली असून राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत त्यातच पंजाब सरकरमधील मंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज विधान केले आहे. त्यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना लक्ष करताना त्यांची तुलना थेट पावसाळ्यातील बेडकाशी केली आहे. “पाऊस येताच ते डराव डराव करत असतात” पाऊस येताच ते डराव डराव करत असतात, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे.
मौसमी मेंढक जब टर..टर..टर.. करता है,
तो कोयल चुप रहता है|हाथी चले बीच बाज़ार,
आवाज़ें आएं एक हज़ार| pic.twitter.com/6iFnPFsmnE— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 12, 2019
सिद्धू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ क्लीप पोस्ट केली आहे.त्यात त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांवर आपल्या खास शैलित टीका केली आहे. त्यात त्यांनी संबित पात्रा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “काळे इंग्रज” आहेत अशी टीका केली होती. त्यावर संबित पात्रा यांनी प्रत्तुत्यर देत मोदी जर “काळे इंग्रज’ आहेत, तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या भारतीय आहेत का ? यावर सिद्धू यांनी एक ट्विट केले त्यात त्यांनी संबित पात्रा यांच्या या प्रश्नाचा समाचार घेतला आहे यामध्ये ते म्हणाले कि, पावसाळी बेडूक जेव्हा डराव डराव करत असतो. अशावेळी कोकीळ नेहमीच शांत राहते. कोणी कितीही किंकाळ्या फोडल्या तरी हत्ती त्याच्या चालीने चालत राहतो, असे म्हटले आहे.