बहुजननामा ऑनलाईन टीम – Salman Khan | बॉलिवूडचा भाईजान म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमानने आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे, तर सध्या सलमान बिग बॉसमुळेदेखील चर्चेत आला आहे. बिग बॉसमध्ये त्याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे दिसत आहे. सलमान खान त्याच्या लव लाइफमुळेही नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत असण्याचे कारणही तेच आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजेच अभिनेत्री सोमी अलीने (Somi Ali) त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Salman Khan)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमी अलीने एक पोस्ट शेअर करत सलमान खानवर गंभीर आरोप केले आहे. तिने त्यांच्या जुन्या एका चित्रपटातील फोटो शेअर करत सलमानवर निशाणा साधला आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने सलमानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही ताशेरे ओढले आहेत. सोमीने शेअर केलेल्या फोटोत सलमान खान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. (Salman Khan)
हा फोटो शेअर करत सोमी अलीने म्हटले की, “माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली एवढेच नाही तर मला खटला भरण्याची धमकीदेखील देण्यात आली. तू भित्रा आहेस, आज माझ्या संरक्षणासाठी पन्नास वकील उभे आहेत. जे मला सिगारेटने जाळण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवण्यासाठी खंबीरपणे उभे आहेत. मला लाज वाटते की, अशा माणसाला तुम्ही सर्व महिला समर्थन करत आहात. आपण कोणाचे समर्थन करतो याचे भान आपल्याला पाहिजे. आता ही लढाई मी लढणार. ही लढाई आर की पारची लढाई आहे”. सध्या सोमीची ही पोस्ट सोशल मीडियावर जोराने वायरल होत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोमीने ही पोस्ट शेअर करताच काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, सध्या या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वेगाने वायरल होताना दिसत आहेत. सलमान आणि सोमी 90 च्या दशकात रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ काही टिकू शकले नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Salman Khan | salman khan ex girlfriend somi ali made serious allegations against him
हे देखील वाचा :
Sushma Andhare | ‘लढाई दोन वाघांची आहे ना; मग कुत्रे का फायदा घेत आहेत?’ – सुषमा अंधारे