वृत्तसंस्था – रशियाचे एक स्वतंत्र सैन्य विश्लेषक पेवेल फेलगेनहॉयेर यांनी इशारा दिला आहे की, येत्या चार आठवड्यांत जगाला एका युरोपियन अथवा जागतिक युद्धाला सामोरे जावे लागू शकते. रशियन सैन्यांच्या या हालचालींचे विश्लेषण करून पेवेल यांनी हे व्यक्तव्य केले आहे.
रशियन लष्कराची ही म्यूव्हमेन्ट युक्रेन आणि क्राइमियाच्या जवळच्या भागात होत आहे. ही अशी जागा आहे जेथे रशियाच्या सत्तेविरोधात आवाज उठतात. रशियाच्या बाजूने या भागाजवळील मोठ्या संख्येने सैन्य जमावानंतर युद्ध होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
काही व्हिडिओ फुटेजमध्ये डझनभर लष्करी हेलिकॉप्टर दिसत आहेत. यासोबत काही टॅंक आणि अन्य सैन्य उपकरणे रेल्वेच्या मदतीने त्या भागात नेले जात आहे.
ही परिस्थिती पाहता पेवेल फेलगेनहॉयेर यांनी रॉसबाल्ट वृतांत सांगितले की, ”आता जी परिस्थिती आहे, त्यामुळे जर महायुद्ध झाले नाही तरी संपूर्ण युरोपीय क्षेत्रात युद्ध पसरू शकते, पण सध्या पाहावे लागेल. पाश्चिमात्य देशांबद्दल बोलताना, ‘त्यांना अद्याप काय करावे हे माहित नाही.’
पेवेल पुढे म्हणाले, ‘सत्य हे आहे की तिथे बरेच काही घडत आहे. तणाव आणि भीती वेगाने वाढत आहे. माध्यमांमध्ये याबद्दल फारशी चर्चा होत नाही, परंतू आम्हाला खूप वाईट संकेत मिळत आहेत. दरम्यान, अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी गुरुवारी हा खुलासा केला की त्यांना रशियामध्ये होणाऱ्या लष्करी हालचालींची माहिती आहे. दुसरीकडे रशियाने हे स्पष्ट केले आहे की जर NATO चे सैन्य युक्रेनला पाठवले गेले तर ते कडाडून विरोध करतील.