बहुजननामा ऑनलाइन – डॉ. रेड्डीज लॅबने भारतात कोरोनाच्या १० कोटी लस विकण्यासाठी रशियन उत्पादक रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) शी करार केला आहे. ही लस नोव्हेंबरपर्यंत भारतात येऊ शकते. ही बातमी समोर आल्यानंतर डॉ. रेड्डी यांचा बीएसईवरील शेअर १८१ रुपयांच्या मजबुतीसह ४६२४.४५ वर पोहोचला.
वृत्तानुसार, आरडीआयएफने रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीच्या भारतातील क्लिनिकल चाचणी आणि वितरणासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजशी करार केला आहे. करारानुसार रशियन कंपनी भारतात डॉ. रेड्डीजला १० कोटी लसींचा पुरवठा करेल.
नोव्हेंबरमध्ये भारतात उपलब्ध होईल
त्यांनी दावा केला की, ह्यूमन एडीनोव्हायरस ड्युअल वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित रशियन लस भारतात कोविड-१९ शी सुरक्षित लढायला मदत करेल. ते म्हणाले की, ह्युमन एडीनोव्हायरस ड्युअल वेक्टर प्लॅटफॉर्मच्या रशियात मागील एका दशकात सुमारे २५० क्लिनिकल चाचण्या झाल्या आहेत आणि त्याचे कोणतेही नकारात्मक परिणाम दिसलेले नाहीत.
भारतात होणार फेज ३ चे परीक्षण
महत्वाचे म्हणजे जगातली पहिली कोरोना लस ११ ऑगस्ट रोजी रशियामध्ये लाँच केली गेली होती, जिचे नाव स्पुतनिक लस ठेवले गेले. या लसीची केवळ फेज १ आणि फेज २ ची चाचणी केली गेली होती.