नवी दिल्ली : Rupay New Debit Card | ऑनलाइन पेमेंटचा वापर देशात वेगाने वाढत आहे. दुसरीकडे ऑनलाइन पेमेंटमध्ये सायबर फ्रॉडची प्रकरणे सुद्धा वाढत आहेत. हे लक्षात घेत किड-फिनटेक स्टार्टअप जूनियो (kid-fintech startup Junio) ने रुपे प्लॅटफॉर्म (Rupay platform) वर प्री-टीन्स आणि टीएनजर्स (pre-teens and teenagers) साठी स्मार्ट मल्टी-पर्पज डेबिट कार्ड (smart multi-purpose debit card for kids) लाँच केले (Rupay New Debit Card) आहे.
किड-फिनटेक स्टार्टअप (Kid-FinTech startup) नुसार जूनियो रुपे कार्ड (Junio Rupay Card) मुलांच्या गरज लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. जे त्यांच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीसाठी डेबिट कार्डप्रमाणे वापरता येऊ शकते. जूनियो रुपे कार्डबाबत सविस्तर जाणून घेवूयात. (Rupay New Debit Card).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसे वापरू शकता जूनियो रुपे कार्ड –
– जूनियो रुपे कार्ड कंपनीने व्हर्च्युअल प्रकारे सुरू केले आहे.
– यासाठी मुले किंवा त्यांचे आई-वडील जूनियो अॅपवर साइन-अप करून शून्य वार्षिक शुल्कावर व्हर्च्युअल जूनियो स्मार्ट कार्डचा वापर करू शकतात.
– या व्हर्च्युअल स्मार्ट कार्डच्या मदतीने मुले आणि त्यांचे आई-वडील ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारची खरेदी करू शकतात.
जूनियो रुपे कार्डमध्ये मिळतील हे फायदे –
जूनियो स्मार्ट कार्डने कोणत्याही प्रकारचे पेमेंट केल्यास मुलांना 7 टक्केपर्यंत कॅशबॅक आणि इतर बक्षीसांसह इतर लाभ मिळतील. तर कंपनीने हे कार्ड लाँच करत सांगितले की, मुलांमध्ये सुरक्षित आर्थिक सवयींना प्रोत्साहन देण्यास जूनियो रुपे कार्ड खुप उपयोगी ठरणार आहे. (Rupay New Debit Card)
जूनियोच्या सह-संस्थापकांनी काय म्हटले –
अंकित गोरा (Junio’s co-founder Ankit Gora) यांनी जूनियो रुपे कार्ड लाँच करताना म्हटले की, यापूर्वी कोणत्याही कंपनीने मुलांना लक्षात घेऊन डिजिटल पेमेंटची सुरुवात केलेली नाही. परंतु जूनियो स्मार्ट कार्ड तरूणांना सहजपणे ऑनलाइन आणि ऑफलाइन पेमेंट करण्याची सुविधा देण्यासह इतरही अनेक लाभ देईल. RuPay प्लॅटफॉर्मची मजबूती पाहता जूनियो रुपे कार्ड सुद्धा लोकांकडून खुप पसंत केले जात आहे.
web title: rupay new debit card rupay launches new debit card for pre teens and teens.
PUC Certificate | गाडीमध्ये ‘PUC’ सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम