बहुजननामा ऑनलाईन टीम : Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रोहितचे चित्रपट कॉमेडी, रोमान्स, ॲक्शनने भरलेले असतात. ‘सूर्यवंशी’ हा रोहितचा शेवटचा चित्रपट चांगलाच गाजला होता. तर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ‘सर्कस’ या चित्रपटातून रोहित भेटीला येणार आहे. गेली बरीच वर्ष या चित्रपटावर काम सुरू होते. (Rohit Shetty)
अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर धुमाकूळ घालत आहे. सिनेसृष्टीत पहिल्यांदाच अशा पद्धतीचे टीझर पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित शेट्टीने या आगामी चित्रपटाचे टीझर सादरीकरण एक अनोख्यात पद्धतीने केले आहे. जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या चित्रपटाच्या टीझर नंतर प्रेक्षक चित्रपट आणि ट्रेलर ची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Rohit Shetty)
चित्रपट 1960 च्या काळातील असल्याचे समोर आले आहे. तर टीझर मधून त्या काळातील गोष्टीवर देखील भर टाकण्यात आले आहे. एवढेच नाही तर इंटरनेट आणि औद्योगिक क्रांती त्या काळात नव्हती तेव्हाचे आयुष्य कसे होते यावर देखील या चित्रपटातील पात्रांनी त्यांच्या तोंडून काही गोष्टी सांगितल्या आहेत. शिवाय हा टीझर पाहून कॉमेडीचा डबल डोस अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की.
हा चित्रपट गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटावर बेतलेला आहे.
तर या चित्रपटाची प्रेरणा गुलजार यांच्या शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या कथेवरून मिळवली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट 23 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रणवीर सिंगसह, जॅकलीन फर्नांडिज, पूजा हेगडे, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, संजय मिश्रा, जॉनी लिवर,
अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
तर रणवीर आणि आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट ही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
Web Title :- Rohit Shetty | rohit shetty ranveer singh starrer most awaited cirkus movie teaser released
हे देखील वाचा :
Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय